Wednesday, December 8, 2021

2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमधील बेशिस्तपणा वाढला आहे. मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर दोन ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.

त्यांना कोवॅक्‍सिन व झायडस कॅडिला लस टोचली जाणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. परंतु, अजूनपर्यंत परवानगी मिळाली नसून साधारणपणे जानेवारीपासून या वयोगटातील मुलांना लस टोचली जाईल, अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली

लस घेतल्याचा सकारात्मक परिणाम समोर आला असून, त्यासाठी पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नगर, नागपूर यासह अन्य जिल्ह्यांमध्ये सिरो सर्वेदेखील करण्यात आला. लस घेतलेल्या व न घेतलेल्यांमधील रोगप्रतिकारक शक्‍तीचा अंदाज घेण्यात आला.

पॉझिटिव्ह तथा कोरोना मृतांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर आता दोन ते 17 वयोगटातील मुला-मुलींनाही लस टोचण्याचे नियोजन केले जात असून, परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

या वयोगटातील मुलांच्या नोंदीसाठी केंद्राला ‘कोविन’ ऍपमध्ये फेरबदल करावा लागणार आहे. त्याचे काम सुरू असून काही दिवसांत परवानगी मिळेल, असा विश्‍वास डॉ. ओक यांनी यावेळी व्यक्‍त केला. 2 ते 17 वयोगटातील मुलांना 28 दिवसांच्या फरकाने ‍कोवॅक्सिनचे दोन डोस टोचले जातील.

झायडस कॅडिला लसीचाही कालावधी तेवढाच राहणार आहे.राज्यातील बहुतेक लोक कोरोना गेल्याच्या समजुतीतून प्रतिबंधित लस घेत नाहीतबाजारपेठांमधील गर्दी वाढली असून त्या ठिकाणी कोरोनासंबंधीचे नियम पाळले जात नाहीतगर्दीत

जाणाऱ्यांकडे मास्क दिसत नाहीत; मास्क अन्‌ लसीकरणामुळे तयार होईल सामूहिक रोगप्रतिकारक शक्‍तीमार्च-एप्रिलमध्ये कोरोनाची येऊ शकते तिसरी लाट; 2 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावानियमांचे पालन अन्‌ लसीकरणाची आवश्‍यकता.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!