Friday, December 3, 2021

नगरमध्ये :अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या ४१ वर्षांच्या व्यक्तीस झाली ही शिक्षा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन मुलीचा रस्त्यात हात धरून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या लक्ष्मीकांत नारायण ढगे (वय ४१, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, गुलमोहर रस्ता) याला चार वर्षे सक्‍तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी ठोठावली.

अल्पवयीन मुलगी १५ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीगेट भागातून वृत्तपत्र घेऊन घरी परत येत होती. आरोपी ढगे याने जवळ येऊन चौथीचे क्‍लास कोठे आहेत? अशी चौकशी करून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे करू लागला. या मुलीच्या घरी

दूध देणारा आणि काही ओळखीच्या व्यक्‍तींनी ही घटना पाहिली. त्यावेळेस त्यांनी आरोपीला जाब विचारला असता, त्याने या प्रकाराची कबुली दिली.मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी ढगे याच्याविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ (पोक्‍सो)

कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक के. डी. शिरदावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. या खटल्यात सरकारच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, मुलीचे पालक, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

ढगे याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास चार वर्षे सक्‍तमजुरी व सात हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ॲड. मोहन कुलकर्णी यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पोलिस हवालदार मोहन डहारे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!