Friday, December 3, 2021

सर्व PAN, आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्या देशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही सर्वांत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. सरकारी मान्यता असलेली ही कागदपत्रं ओळखीचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यापासून ते मोठ्या बँकिंग

व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय इतर अनेक आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड असणं बंधनकारक आहे. त्याच वेळी, आधार कार्डचा वापर ओळख दर्शविण्यासाठी केला जातो. प्रत्येक नागरिकाकडे ही दोन कागदपत्रं असणं महत्त्वाचं आहे.

ही कागदपत्रं नसल्यास अनेक कामांत अडथळे येतात.सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासह अनेक सरकारी कामांमध्ये याची गरज असतेच. प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. तसंच 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या नागरिकांचं पॅन कार्ड 1 एप्रिल 2022 पासून निष्क्रिय होईल. त्यामुळे तुमचं आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर ते तत्काळ करून घ्या.

यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, ती घरबसल्या ऑनलाइनदेखील करता येते. खालील टप्प्यांत ही प्रक्रिया करता येते.

– सर्वप्रथम प्राप्तिकर कर विभाग अर्थात इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर जा.

– आधार कार्डमध्ये दिल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

– आधार कार्डमध्ये फक्त जन्माचं वर्ष दिलं असल्यास चौकोनावर टिक करा.

– आता कॅप्चा कोड टाका.

– आता ‘लिंक आधार’ या बटणावर क्लिक करा

– त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलं जाईल.

याशिवाय एसएमएसद्वारेदेखील तुम्ही हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल. यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाका. आता हा संदेश 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.

तुमचं पॅन कार्ड काही कारणाने निष्क्रिय झालं असेल तर ते पुन्हा सुरू करता येते. यासाठी तुम्हाला एक एसएमएस पाठवावा लागेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून मेसेज पाठवण्यासाठी मेसेजमध्ये आधी 12 अंकी पॅन क्रमांक टाका. त्यानंतर स्पेस देऊन 10 अंकी आधार क्रमांक टाका. हा एसएमएस 567678 किंवा 56161या क्रमांकावर पाठवा. तुमचं पॅन कार्ड पुन्हा कार्यरत होईल.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!