Saturday, November 27, 2021

शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती होऊन दोन महिने झाले तरीही त्यांना कारभार पाहता येत नाही. विश्वस्त मंडळाच्या पाच जागा रिक्त आहेत, त्यावर नियुक्ती झाल्याशिवाय कारभार पाहता येणार नाही, असा

आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. सरकारकडून मात्र उरलेल्या पाच जागांच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप होत नाही. आता तर मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण सांगून यासाठीची मुदत वाढवून घेतली आहे. न्यायालयाने आता १४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

तोपर्यंत तदर्थ समितीमार्फतच संस्थानचा कारभार पाहिला जाणार आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा पेच कायम आहे. एका बाजूला तीन पक्षांच्या सरकारमधील निर्णयाचा गोंधळ आणि दुसरीकडे

न्यायालयीन प्रक्रिया या कचाट्यात हे विश्वस्त मंडळ सापडले आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपात या देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आले. त्यानुसार १६ सप्टेंबरला अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्यासह बारा जणांचे विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आले. मात्र, नियमानुसार हे मंडळ १७ सदस्यांचे आहे. अपूर्ण मंडळाच्या हाती कारभार सोपविला जाऊ शकत नाही, हा मुद्दा उपस्थित होऊन प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. त्यासाठी सरकारकडून उरलेल्या

पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी वेळोवेळी मुदत घेण्यात आली.पूर्वी दिलेली मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत होती. या दिवशी हे प्रकरण पुन्हा न्यायालयापुढे आले. त्यावेळी सरकारी वकिलांनी आणखी मुदत वाढवून देण्याची विनंती केली. त्यासाठी मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीचे कारण देण्यात आले. न्यायालयाने ही विनंती मान्य करून पुढील सुनावणी १४ डिसेंबरला ठेवली आहे. तोपर्यंत पूर्वीच नियुक्त करण्यात आलेली न्यायालयाच्या देखरेखीखालील तदर्थ समिती काम पाहणार आहे.

नियुक्ती झालेल्या अध्यक्षांसह बारा सदस्यांना आणखी महिनाभर वाट पाहण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!