Friday, December 3, 2021

मोठी बातमी: बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे फडणवीस यांच्या भेटीला गेले. दोन्ही नेत्यांच्या भेटीमागेच कारण एकच होते, मग दोघेही वेगवेगळे का गेले, यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्याच्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने उमेदवार देऊ नये, अशी मागणी केल्याची माहिती पटोले

 यांनी फडणवीसांशी झालेल्या भेटीनंतर माध्यमांना दिली. पण त्यानंतर काही तासांतच थोरातांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत जाऊन फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी पटोले यांच्या भेटीबाबतचा खुलासा केला आहे. दोन्ही नेते वेगवेगळ्या वेळेत का भेटले, या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले, नाना पटोले हे दोन कारणांसाठी फडणवीसांना एकटे भेटले. पटोले यांना लवकर जायचे होते.

त्यांच्या घरी विवाहाचा कार्यक्रम होता. त्याची पत्रिकाही फडणवीसांना दिली. त्यामुळे ते फडणवीसांकडे जाणार असल्याने तुम्हीही बिनविरोध निवडणुकीबाबत विनंती करा, असे त्यांना सांगितले होते, अशी माहिती थोरात यांनी दिली.

शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. अशा दुर्देवी घटनेमुळे जागा रिक्त झाली तर ती त्या पक्षाला बिनविरोध देण्याची परंपरा आहे. त्यासाठी विनंती करण्यासाठी मी भेटलो. चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. आता आम्ही केवळ या जागेसाठी विनंती केली आहे. इतर जागांबाबत चर्चा करायची असेल तर केली जाईल. जंयत पाटील यांना मी जाण्याबाबत सांगितले होते. पण त्यांच्या नियोजित बैठकीमुळे आले नाहीत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!