Friday, December 3, 2021

अंगावर कपडे असताना स्पर्श केला तरीही लैंगिक शोषण:सु्प्रीम कोर्टा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:त्वचेचा त्वचेशी संपर्क आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार किंवा शोषण होऊ शकत नाही असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र हा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने बदलला आहे. त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला

तरच लैंगिक अत्याचार म्हणता येईल असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्यावरून चांगलाच वादही निर्माण झाला होता.पॉक्सो कायद्यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय आहे. त्वचेचा त्वचेशी संपर्क आला नाही,

तरीही पॉक्सो कायदा लागू होतो. असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. न्या. यू. यू. ललित, न्या. रविंद्र भट आणि न्या. बेला त्रिवेदी या तीन सदस्यीय पीठाने हा निर्णय दिला. लैंगिक हेतूने शरीराच्या गुप्तांगाना स्पर्श केला तरीही पॉक्सो कायद्याचेच प्रकरण मानले जाईल.

कपड्यांवरून मुलीला स्पर्श करणे लैंगिक शोषण नाही असे म्हणता येणार नाही. पॉक्सो कायद्यातील कलम सात नुसार स्पर्श आणि शारीरीक संपर्काचा अर्थ त्वचेचा त्वचेशी संपर्क इथपर्यंत ठेवल्याने तो संकुचित मूर्खपणा ठरेल.

अशा प्रकारे त्या तरतुदीचा अर्थ काढला तर मुलांना लैंगिक शोषणापासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पॉक्सो कायद्याचा हेतूच संपुष्टात येईल असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत त्याला शिक्षाही सुनावली आहे.

अंगावर कपडे असताना लहान मुलीच्या छातीला स्पर्श लैंगिक अत्याचार नाही, हात पकडणं, पँटची चेन उघडणंही लैंगिक अत्याचार नाही, त्वचेचा त्वचेशी संपर्क आला नसेल, तरीही लैंगिक अत्याचार नाही. हो, हे आम्ही नाही तर मुंबई हायकोर्टानं फेब्रवारी महिन्यात म्हटलं होतं.

अल्पवयीन मुलीचा हात पकडणं किंवा पँटची चेन उघडी असणं हे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पॉक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचार ठरत नाही. पॉक्सो कायद्यातील कलम 7 आणि 9 चा निर्वाळा देत न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी म्हटलंय.

गडचिरोलीतील आरोपीनं 11 फेब्रुवारी 2018 मध्ये एका 5 वर्षीय मुलीचा हात पकडला होता, तिची आई नोकरीला गेलेली, तर वडीलही शहराबाहेर होते. जेव्हा आई परतली, तेव्हा आरोपीनं मुलीचा हात पकडला होता आणि त्याच्या पँटची चेन उघडी होती. याबाबत आईनं पोलिसांकडे तक्रारही केली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!