Tuesday, November 30, 2021

शरद पवार यांनीच खरा एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन भेटीगाठीचा सिलसिलाही सुरु आहे.

आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनीही फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पडळकर

यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. शरद पवार यांनीच खऱ्या अर्थाने मागील 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला. त्यांची एकमेव संघटना मान्यताप्राप्त आहे. मात्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त संघटनेशीच चर्चा करतं.

मात्र आजपर्यंत पवारांच्या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत. सरकार आणि मान्यताप्राप्त संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांचा घात केल्याचा घणाघात पडळकर यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार जर 2050 पर्यंत राहिले

तर तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनातही ते 1980 आणि 2020 मधल्या भाषणातील मुद्देच सांगतील. जर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले तर त्यांची संघटना उरणार नाही. निवडणुकीवेळी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करता येणार नाही’, असा खोचक

टोलाही पडळकर यांनी लगावला आहे. त्याचबरोबर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यावर आझाद मैदान सोडणार नाही, असंही पडळकर यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं.

सरकार या संपावर मार्ग काढण्याऐवजी भीती दाखवण्याचं काम करत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा देत आहे. त्यांना निलंबनाच्या नोटीसा देत आहे. आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. पण तुम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही बोलतच

नसाल तर त्यातून मार्ग कसा निघेल. देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग कसा निघू शकतो याबाबत सरकारला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आम्ही केवळ भांडत नाहीत, तर प्रश्नावरील उत्तरही देत आहोत. त्यामुळे आता मार्ग काढायचा की नाही काढायचा हे सरकारच्या हातात आहे, असं पडळकर म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!