Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील या कार्यक्रमाला अजित पवार, अण्णा हजारे एकाच व्यासपीठावर येणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रविवारी (२१ नोव्हेंबर) एका व्यासपीठावर येणार आहेत. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराजांचा अभंग गाथा प्रकाशन सोहळा व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त या दोघांसह

 महाविकास आघाडीचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. हजारे यांनी पवार यांच्यासह अन्य नेत्यांसंबंधी राज्य सहकारी बँक आणि साखर कारखाने विक्री प्रकरणी आरोप केलेले आहेत.

तर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हजारे यांना टाळण्याची भूमिका यापूर्वी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने का होईना ते एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

पारनेरचे आमदार आणि अल्पावधीतच पवारांचे निकटवर्तीय बनलेले नीलेश लंके या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाबद्दल देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे व कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले की, संत निळोबाराय महाराजांच्या दिंडीला १२५ वर्षांची परंपरा आहे. पंढरपूर येथील आषाढी वारीत

राज्यातील मानाच्या दिंडीमध्ये ९ वे स्थान आहे. १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होत आहेत. २१ नोव्हेंबरला संत निळोबाराय महाराज अभंग गाथा प्रकाशन सोहळा, निळोबारायांच्या वाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या

जीर्णोद्धाराचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, चैतन्य महाराज देगलूकर आदी उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!