Saturday, November 27, 2021

राधाकृष्ण विखे पाटलांचा अत्यंत गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्याच्या आशीर्वादाने राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असून मंत्र्यांचे नातेवाईक व बगलबच्चे

या तस्करीत सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.राज्यात आता वाळू माफियांप्रमाणेच गुटखा माफिया देखील तयार झाले असून बीड जिल्ह्यात शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाकडे ३२ लाख रुपयांचा गुटखा सापडला आहे.

राज्य सरकारचं अवैध धंद्यांना छुपे समर्थन असून अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर आगामी निवडणुका जिंकण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे,’ असा घणाघातही विखे पाटील यांनी केला आहे. पोलिसांच्या नाकाखाली

गुटख्याचा अवैध धंदा सुरू असून बीड गुटखा प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून सरकारची इच्छा याबाबतीत प्रामाणिक असल्याचं सिद्ध करावं, अशी मागणीही त्यांनी केली.राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून अनेकांनी

आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकार शुद्धीवर यायला तयार नाही. संप मोडण्याची भाषा करण्यापेक्षा आणि हा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा,’ असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला केलं आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!