Friday, December 3, 2021

नगर जिल्हा रुग्णालय अग्नितांडव : पोपटराव पवारांचा जबाब नोंदवला जाणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्हा रुग्णालयातील कोविडच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या दाखल गुन्ह्याचा तपास तांत्रिक मुद्यांवर आहे. यामुळे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासमोर तांत्रिक मुद्यांमधील त्रुटींचा

शोध घेत पुरावे उभे करण्याचे आव्हान आहे. आगीची घटना मोठी असल्याने गुन्ह्यात तपासाची व्याप्ती देखील मोठी आहे. या घटनेच्या दाखल गुन्ह्यात पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह सुमारे 100 पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिटके यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपासाच्या सुरूवातीला वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका, अशा चार जणांना अटक केली आहे. या घटनेतील निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा

यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी सुरेश ढाकणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेत दाखल गुन्ह्याच्या प्राथमिक

तपासात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या कार्यकर्तव्यातील हलगर्जीपणाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्यात तांत्रिक पातळीवर तपास करत असल्याने गती मिळताना दिसत नाही.

तांत्रिक पातळीवर तपास करताना त्यातील त्रुटी शोधून गुन्ह्यात दोषसिद्धता करायची आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याची प्रतिक्रिया उपअधीक्षक मिटके यांनी दिली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!