Saturday, November 27, 2021

रोहित पवारांचा सणसणीत टोला म्हणाले ही भाजपची….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून टीकात्मक स्वागत केले जात असताना सत्ताधाऱ्यांकडून माघारीचा

निर्णयावरही प्रचारकी प्रतिक्रिया येत आहेत. याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी भाजपला टोला लागवला आहे. आधी चूक करायची आणि ती सुधारल्यानंतर त्याचा जल्लोष करायचा ही भाजपची जुनी सवय आहे. त्यामुळं या निर्णयाचा तरी भाजपने जल्लोष करू नये,

असा सल्लाही आमदार पवार यांनी दिला आहे.आपल्या ट्विटमध्ये आमदार पवार यांनी म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याच्या केलेल्या घोषणेचं मनापासून स्वागत करतो. देशभरातील शेतकऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे

दिलेल्या लढ्याचं हे यश आहे. सरकारने हा निर्णय आधीच घेतला असता तर शेकडो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते व त्यांचे हालही झाले नसते. आगामी पंजाब आणि उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतरही हा निर्णय असाच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. यापुढे

कायदे करत असतांना सरकारने सर्वसामान्य जनतेला आणि विरोधी पक्षाला विश्वासात घेतल्यास सरकारवर अशी वेळ पुन्हा येणार नाही. इंधनाचे दर भरमसाठ वाढवून त्यात थोडी घट करताच भाजपने जल्लोष केला. आधी चूक करायची आणि ती सुधारल्यानंतर

त्याचा जल्लोष करायचा ही भाजपची जुनी सवय आहे. त्यामुळं या निर्णयाचा तरी भाजपने जल्लोष करू नये. अन्यथा ती आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा ठरेल, असेही पवार यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!