Wednesday, December 8, 2021

नगर जिल्हा रुग्णालयाला आगीचं प्रकरण : डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चारही आरोपींना जामीन मंजूर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीप्रकरणात आज कोर्टाने चारही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये चारही आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह परिचारिका सपना पाठारे, अस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्याने या अटकेच्या कारवाईचा निषेध नोंदवला होता.

ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप डॉक्टर संघटना, परिचारिका संघटनांनी केला होता. सोबतच या प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली होती.शनिवारी ६ नोव्हेंबर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती .

या दुर्घटनेत बारा रुग्णांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती.

याप्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक आली होती. दरम्यान आज या चारही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!