नेवासा
नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथून १०० मोटरसायकल स्वरांची दिंडी श्रीक्षेत्र माहूर गडाकडे रवाना झाली आहे.
जेऊर (भेंडा) येथील भाविक रामराव जाधव व बबनराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रति वर्ष प्रमाणे
८० ते १०० मोटासायकलस्वार भाविक हे दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही रेणुका माता दर्शनसाठी माहूर गड जिल्हा नांदेड कडे सोमवार दि.3 रोजी सकाळी जेऊर येथून रवाना झाले.
मोटासायकलस्वार दिंडी जंतुर येथून जात असताना मंगळवार दि.04 रोजी सकाळी 8 वाजता महामार्ग पोलीस केंद्र जिंतूर येथील अधिकारी यांनी भाविकांना वाहतुकीचे नियम आणि हेल्मेटचे महत्व समजाऊन सांगितले.
तसेच सर्व भाविकांना चहापाण करून सर्वांनी हेल्मेट परिधान केल्यामुळे प्रत्येकाला पुष्गुच्छ देवून पुढील प्रवासासाठी शुभेच्या देण्यात आल्या.
यावेळी नांदेड महामार्ग पोलीस विभागाचे पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे, महामार्ग पोलीस केंद्र जिंतूरचे उपनिरीक्षक श्री.कदम,श्री.मुरकुटे, पोलीस अंमलदार शेख शकील, शब्बीर पठाण, सचिन गुरसुडकर, विशाल ठाकूर व बाळासाहेब गिराम हजर होते.