Wednesday, December 8, 2021

शरद पवारांच्या त्या वक्तव्याला आम्ही महत्व देत नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मला वाटलं होतं की, कॉंग्रेस पक्षामध्ये सर्व निर्णय दिल्लीत हायकमांड घेतात, पण हल्ली कॉंग्रेसचे निर्णय भंडारा, गोंदिया आणि चंद्रपुरातील नेते घेत आहेत. हे बघून आश्‍चर्य वाटतं, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल

गडचिरोली जिल्ह्याच्या दोऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलले. त्यावर शरद पवारांना आम्ही महत्व देत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया नाना पटोलेंनी आज दिली.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भात एकच दुकान आहे आणि तेसुद्धा लवकरच बंद पडेल.

कारण एक दुकान बंद पडायला, असा कितीसा वेळ लागतो, अशा शब्दांत डिवचणारे विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाण्यात केले होते. त्यावर नाना पटोले भाजप पक्षाकडून खासदार झाले होते. भाजपच्या संस्कृतीत ते राहिलेले आहेत. त्या संस्कृतीनुसार, त्यांनी तसे विधान केले असावे.

पण कॉंग्रेस असो की राष्ट्रवादी, आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांवर चालणारे पक्ष आहोत. नाना तसे बोलू शकतात, पण आम्ही नाही बोलू शकत. कारण आम्हाला आमची संघटना तर चालवायचीच आहे, पण सरकारही चालवायचे आहे, असे पवार म्हणाले होते.

येवढेच सांगून थांबतील ते पवार कसले? पटोलेंनी ‘दुकान बंद’ म्हणत डिवचल्यानंतर एकेकाळी पटोलेंचे नागपुरातील बजाजनगर येथे उठबस असलेले जुने दुकान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परवा बंद केले आणि पटोलेंना काय सांगायचे तो संदेश दिला.

या घडामोडींनंतर नाना पटोले यांना विचारणा केली असता, आम्ही शरद पवारांना महत्व देत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी आज दिली.साकोली तालुक्यातील त्यांच्या सुकळी या गावात निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले, आमचं हायकमांडच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असे पटोले म्हणाले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!