Wednesday, December 8, 2021

बावीस वर्षीय विवाहितेवर दोन सख्या भावांकडून अत्याचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका बावीस वर्षीय विवाहितेवर माहेर गावातील दोन सख्या भावंडांनी अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पती किंवा सासरच्या कोणताही काही सांगितले तर तुझ्या मुलांला मारुन टाकेन, अशी धमकी देत संबंधितांनी

वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका गावात २०१९ मध्ये पीडित विवाहितेचा २१ वर्षेीय युवक वारंवार पाठलाग करत होता. मोबाईलवर

काॅल करुन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला खूप आवडतेस, असं तो विवाहितेला म्हणत होता. यावेळी पीडितेने माझे लग्न झाले असून, मला एक मुलगाही आहे. तु मला परत फोन करू नको, असे सांगितले. मात्र, तो नेहमी फोन करू लागला. त्यामुळे विवाहितेने त्याचा

फोन ब्लाॅक केला. दरम्यान एके दिवशी पीडित महिला शेतात जात असताना संबंधित २१ वर्षाच्या युवकाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी नेहून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतरही तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केला.

त्याचवेळी ही बाब अत्याचार करणाऱ्या युवकाच्या २० वर्षाच्या धाकट्या भावाला कळाली. आणि त्या धाकट्या भावानेही  पीडितेला वारंवार काॅल करण्यास सुरुवात केली. मी तुझ्यावर प्रेम करणार म्हणजे करणार. तु जरी नाही म्हणालीस तरी मी तुझ्यावर प्रेम

करणार असे तो फोनवर पीडितेला बोलत होता. मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पीडितेला तो काॅल करण्यास भाग पाडत होता. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री दहा वाजता पीडितेच्या घराच्या पाठीमागील पडक्या घरात या धाकट्या भावानेही पीडित विवाहितेवर अत्याचार केला.

अखेर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने पिडीत विवाहितेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर दहिवड पोलीस ठाण्यात त्या दोघा भावांच्या विरोधात तक्रार दिली आहे. दहिवडी पोलीस दोन्ही युवकांचा शोध घेत असून, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. नीलेश देशमुख हे अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!