Wednesday, December 8, 2021

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त कधी होणार?; बाळासाहेब थोरात म्हणतात…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर अक्षरशः भिडलेले होते. केंद्राने इंधन दरावरच्या करात कपात केल्यानंतर सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही पेट्रोल-डिझेलचे दर राज्यात बऱ्याच ठिकाणी १००च्या वरच आहेत.

महाराष्ट्र सरकारनेही व्हॅट व इतर करात कपात करावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकार कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे जीएसटीचे 50 हजार कोटी रुपये केंद्राने अद्याप दिले नसल्याचे त्यांनी म्हटले.

इगतपुरी तालुक्यात काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या सभेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, इंधन दरवाढीचा

आम्ही विरोध केला आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधनावरील करात वाढ केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे ५० हजार कोटी केंद्राने अद्यापही दिले नाहीत. करोनामुळे उत्पन्न घटले असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावे लागत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

भाजपाकडून एसटी आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. सरकारी सेवेत घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. मात्र, हा निर्णय घेणे कठीण असल्याचे थोरात यांनी म्हटले. राज्यात भाजपाची सत्ता असताना

 त्यांनी एसटीचे विलिनीकरण केले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेणे शक्य नसल्याचे भाजपाच्या तत्कालीन प्रमुख मंत्र्याने म्हटले होते. आता भाजपा आंदोलन करत असल्याचे थोरात यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...

नगर जिल्ह्यात या ठिकाणी गावरान कांद्याला विक्रमी भाव…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले.गावरान कांद्याची सुमारे 17 हजार 715 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला 3000 ते 3300 रुपयांचा...
error: Content is protected !!