Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यात पोलिसच निघाला वाळू तस्कर ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचा अधिकार महसूल व गौणखनिज विभागाला आहे. बऱ्याच वेळा पोलिसही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना दिसतात.

मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. एक पोलिस कर्मचाऱ्याचीच वाहने अवैध वाळू तस्करी करताना महसूल प्रशासनाला आढळून आली आहेत. त्यामुळे हे प्रकरण जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

कर्जत-जामखेडचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना अवैध वाळूवाहतूक करणारा ट्रक आढळून आला. त्यांनी तो ट्रक अडविला. ट्रक चालकाने प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ करून ट्रक पळवून नेल्याप्रकरणी

 पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे व अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.या संदर्भात तलाठी दीपक बिरुटे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे,

की काल (शुक्रवार) सकाळी साडेसातच्या सुमारास प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच कर्जत मंडळ अधिकारी बाळासाहेब सुद्रिक व तलाठ्यास बोलावून घेतले.

कर्जत शहरात अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलो असता, एका ट्रक (एमएच 12 आरएन 4704) अंदाजे तीन ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला. डॉ. थोरबोले यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालक वाहनासह पळून गेला.

याप्रकरणी कर्जत पोलिसांनी केशव व्हरकटे व अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केशव व्हरकटे हा पोलिस कर्मचारी आहे. त्यामुळे अवैध गोष्टींना विरोध करण्यासाठी असलेले पोलिसच अवैध वाळुवाहतूक करत असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.

केशव व्हरकटे पसर आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!