Friday, December 3, 2021

शंकरराव गडाख तुम्ही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व्हा !

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरातील मनकर्णीका लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात माजी आमदार विजय औटी बोलत होते. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,

जि. प.च्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते (सर), संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रुमख शशीकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे,

ताराबाई चौधरी, पोपट चौधरी, युवा सेना प्रमुख नीतीन शेळके, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, नगराध्यक्षा वर्षा नगरे, शंकर नगरे, अनिकेत औटी, नीलेश खोडदे, युवराज पठारे, सुरेश बोहृडे, बाळाासाहेब पठारे, दिलीप दाते, दत्ताशेठ कुलट, राजू शेख, बबन शेख,

दत्ता औटी यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना औटी म्हणाले, राज्याच्या विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्याचा निर्णय उध्दव ठाकरे यांना घ्यावा लागला.

अशी भुमिक का घ्यावी लागली त्या गोष्टींचे काही ठराविक साक्षिदार आहेत. त्यापैकी मी एक आहे. मागील सरकारमध्ये पहिला अन्याय माझ्यावरच झाला. नैसर्गिक निर्णय प्रक्रियेप्रमाणे तिन महिन्यात माझ्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद येणे अपेक्षित होते.

मात्र तसेच झाले नाही. प्रादेशिक पक्ष संपविण्याचे धोरण भाजपाने अवलंबिण्यास सुरूवात केली. त्यामुळेच भाजपा सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले.

सामान्य जनतेच्या हितासाठी मंत्री गडाख यांनी आमच्या पाठीशी उभं रहावं. तुम्ही जिल्हयाच्या राजकरणात फार मोठे व्हाल असे सांगून तुम्ही जिल्हयाचे पालकमंत्री व्हा, वेळ आली तर आम्ही उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी येतो असे औटी म्हणाले.

गेल्या १५ वर्षात शिवसैनिंकांचा संच मी सांभाळला. राजकारणात उलथापालथ होत असते. मी काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. माझे वडील आमदार होते, पत्नी सभापती तर मी जि. प. सदस्य व तिनदा आमदार होतो. जनतेने आमच्या कुटूंबावर प्रेम केले.

विश्‍वास टाकला. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी लढणार अशी प्रतिज्ञा औटी यांनी केली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!