Friday, December 3, 2021

चारित्र्याच्या संशयावरुन धक्कादायक प्रकार, विवाहित महिलेची कौमार्य चाचणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातुन एक अशीच घटना समोर आली आहे. ज्यामध्ये लग्न झाल्यानंतर नवविवाहित महिलेच्या नवऱ्याने तिच्यावरती संसय घेऊन तिला कौमार्य चाचणी म्हणजेच वर्जिनिटी टेस्ट करायला लावली. ते एवढ्यावरच न थांबता या महिलेला

 मुलं झालं आणि ती मुलगी असल्या कारणामुळे तिचा छळ करुन माहेरी पाठवण्यात आले.ज्यानंतर या २५ वर्षिय विवाहित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रेर नोंदवली आहे. त्यावरुन पोलिसांना पती आकाश शिंदे (वय २६, रा. ठाणे) याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळं प्रकरण 2017 ते जानेवारी 2021 दरम्यान घडलं आहे.पोलिसांनी सांगितले की, या महिलेच्या नवऱ्याने लग्न झाल्यापासून बऱ्याचदा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि कौमार्य चाचणी केली.

तसेच या महिलेला मुलगी झाली म्हणून तिला मानसिक आणि शरीरीक त्रास दिला गेला. तिला घरातील सर्व कामे करायला लावून उपाशी ठेवले गेले. या महिलेचा पती आकाश हा दारु पिऊन शिवीगाळ करुन तिला मारहाण करत असे. तसेच तिला जानेवारीमध्ये माहेरी पाठवून दिले.

त्यानंतर महिलेला घरी नवऱ्याने घेतलेच नाही.ही महिला जबरदस्ती जेव्हा तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की, तिच्या नवऱ्याने आपले घर बदलले आहे. तसेच त्याच्या घरच्यांनी तिचे फोन घेण्यासाठी देखील टाळाटाळ केली.

ज्यामुळे शेवटी या महिलेला पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय काहीही पर्याय उरला नाही.ज्यानंतर या महिलेनं मानसिक आणि शारिरीक छळाची तक्रार पोलिसात दिली. सहायक पोलीस निरीक्षक आता या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!