Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकिंग: वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहराजवळील घोडेगाव रोडवर आंबील ओढा परिसरात उसाने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात राशीन येथे कार्यरत आरोग्य सेवक नवनाथ विठ्ठल काशीद (वय-34)

हे जागीच ठार झाले. दुसर्‍या घटनेत निमगाव खलू येथील शेतकरी सतीश किसन कातोरे (वय 51) शेतामध्ये उसाला पाणी देवून घरी येत असताना रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेने त्यांना जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाले.

राशीन येथून ड्युटी संपवून घरी श्रीगोंदाकडे श्रीगोंदा-घोडेगाव रोडने दुचाकी (एमएच 16 बीएक्स 8937) आणि अंबालिका कारखान्याकडे जाणारा दोन टेलर उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच 16 बीएम 4555) यांची समोरासमोर धडक झाली.

यात नवनाथ विठ्ठल काशीद (वय- 34 आरोग्य सेवक, राशीन ता. कर्जत रा. बालाजीनगर श्रीगोंदा, मुळगाव रा. खर्डा ता. जामखेड) हे जागीच ठार झाले. ट्रॅक्टर चालक केशव रामभाऊ भोईटे (रा.लिपणगाव, ता. श्रीगोंदा) याने जखमीस कोणतीही मदत न करता व अपघाताची

खबर न देता पोबारा केला. याबाबत मयताचे चुलते शंकर रामचंद्र काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक केशव रामभाऊ भोईटे यांच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भादवी कलम 304 अ, 427, 184, 314, मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमगाव खलु येथील शेतकरी सतीश किसन कातोरे (वय 51) हे शेतामध्ये उसाला पिकास पाणी देण्यास गेले होते. रात्री 11:25 च्या दरम्यान लाईट आल्याने पिकास पाणी देऊन घरी निमगाव खलू येथे पायी येत असताना रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक

आलेल्या रेल्वेने त्यांना जोराची धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. याबाबत शिवाजी सतीश कातोरे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...
error: Content is protected !!