Tuesday, November 30, 2021

राधाकृष्ण विखे संतापले म्हणाले सरकारला अजून किती कामगारांचे मृत्‍यु हवे आहेत ? 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एसटी कामगारांच्या संपासंबंधी भाजपाचे ज्येष्ठ नेते व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मागील पंधरा दिवस एसटी कामगार संपूर्ण राज्यात

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना सरकारला मात्र त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. न्‍याय मिळत नसल्‍याने कामगारांच्‍या आत्‍महत्‍येच्‍या घटना रोज घडू लागल्‍या आहेत. राज्यात आतापर्यंत ४० हून अधिक एसटी कामगारांचे मृत्यू झाले आहेत.

दिवसागणिक ही संख्‍या वाढत चालली असतानाही संपाबाबत सरकार जर काहीच निर्णय करणार नसेल तर हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. सरकारला अजून किती कामगारांचे मृत्‍यु हवे आहेत? सरकारने कामगारांच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍याबाबत फार प्रतिष्‍ठेचा विषय न करता

सकारात्‍मक भूमिका घेतली पाहिजे. कामगारांवर कारवाई करणे हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे येऊन कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय करावा. विनाकारण संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या मान्य करून

न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा म्हणून एसटीच्या सुविधेकडे पाहिले जाते. परंतु या कामगारांच्या प्रश्नाकडेच महाविकास आघाडी सरकारला पाहायला वेळ नसल्याची खंत वाटते. एसटी कामगारांच्या श्रमातून महामंडळाचा डोलारा उभा राहिला आहे,

हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये. सरकारने कामगारांच्या प्रश्नाचा विषय जाणीवपूर्वक प्रतिष्ठेचा केला आहे. कामगारांना न्याय देण्याऐवजी सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. कामगारांचे निलंबन करण्‍यात महाविकास आघाडी सरकारला कसले भूषण वाटते? कामगारांवर कारवाई करणे

हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे येऊन कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय करावा. विनाकारण संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!