Friday, December 3, 2021

आरोग्य मंत्री राजेश टोपे घेणार इंदुरीकर महाराजांची भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असून लशीबाबत त्यांचे प्रबोधन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लस घेणार

नसल्याचे वक्तव्य केले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्याचबरोबर राज्यात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे, इंदुरीकर महाराज यांची भेट घेऊन लशीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यांचे प्रबोधन

करणार आहेत. इंदुरीकर महाराजांचे आज जालन्यात किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याआधी राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत.आता इंदुरीकर महाराज जालन्यामध्ये येणार आहेत. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांची भेट घेणार आहेत.

अधिकाधिक लोकांनी कोरोना लसीकरण करावे यासाठी त्यांनी आवाहन करावे यासाठीही राजेश टोपे आवाहन करणार आहेत. दरम्य, काही दिवसांपूर्वी एका किर्तनादरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीबाबत इंदुरीकर महाराज यांनी नकारात्मक विधान केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी कोरोना लसीकरणात वाढ व्हावी यासाठी आवाहन करावे असे म्हटले होते. राजेश टोपे यांनी केलेल्या विनंतीनंतर

सलमान खान यांनी देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध करून लसीकरणासाठी आवाहन केले होते. मात्र, भारतीय जनता पार्टीने या व्हिडिओवर आक्षेप घेतला होता.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!