Friday, December 3, 2021

मंत्री शंकरराव गडाख म्हणाले तर गाठ माझ्याशी आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विजय औटी यांना जर संधी दिली असती तर दुष्काळी पारनेर तालुक्याचे रूपडे बदलून दाखविले असते, असे मत राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर चालू आहे, त्यामूळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय पुढे नेण्याचे काम आपण करणार आहोत. महसूल, पोलिस किंवा इतर कार्यालयात कोणी त्रास देत असेल तर गाठ माझ्याशी आहे, कारण आमचा मुख्यमंत्री आहे, असा इशारा मंत्री गडाख यांनी बोलताना दिला आहे.

पारनेर शहरातील मनकर्णिका मंगलकार्यालयात पारनेर तालुका शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,

संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे, युवानेते अनिकेत औटी, तालुकाप्रमुख विकास रोहकले,

युवासेना तालुकाप्रमुख नितीन शेळके, बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, पारनेर शहरप्रमुख नीलेश खोडदे, पंचायत समिततीचे माजी सदस्य शंकर नगरे, पै. युवराज पठारे, नगरसेवक दत्तात्रय कुलट, बंडु सप्रे,

ताराबाई चौधरी, संतोष येवले, ढवळपुरीचे सरपंच राजेश भनगडे, पोपट चौधरी, विकास सावंत, महिला आघाडी प्रमुख डॉ. वर्षा पुजारी, प्रियंका खिलारी, भाळवणीच्या सरपंच लीलाबाई रोहकले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.मंत्री गडाख म्हणाले, शिवसेनेत जी मरगळ आली होती ती आता विजय औटी

यांनी गोड बोलून बर्‍याच प्रमाणात बाजूला केली आहे. माजी आमदार औटी पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही औटी यांचा पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. औटी यांचा पराभव झाल्यानंतर प्रचंड त्रास झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यांना मुख्यमंत्री होण्यात रस नव्हता. राज्यात महाआघाडी सरकार असून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी निवडून आलो तर तुमच्या बरोबर येईल असा शब्द दिला होता. तो शब्द मी पाळला असल्याचे मंत्री गडाख यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!