Friday, December 3, 2021

या वादात बाळासाहेब थोरात यांनीही घेतली उडी म्हणाले…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगना राणावत हिने भारतीय स्वातंत्र्यलढ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि देशभर मोठा गदारोळ झाला. भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं,

असं म्हणत कंगनाने अकलेचे तारे तोडले. कंगनाच्या या वक्तव्यावर चहुबाजूने टीका होत असताना ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी मात्र कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केलं. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते व महसूल मंत्री

बाळासाहेब थोरात यांनी विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे.बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाला ४० बॉडीगार्डची सुरक्षा आणि पद्मश्री हा पुरस्कार मिळतो, हे बघून विक्रम गोखले पुढे आले. त्यांनाही पद्मश्री व्हायचंय वाटतं,’ असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

केंद्र सरकारने वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतल्याने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ताळेगाव येथे शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी थोरात बोलत होते.

‘ठराविक लोकांसाठी केंद्राकडून कायदे तयार करण्याचं काम सुरू आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असताना टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले? कंगणा राणावत काय बोलते? स्वातंत्र्याबद्दल बोलण्याचा

तिला अधिकार आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!