Friday, December 3, 2021

आता इंदुरीकर महाराज करणार कोरोनाची लस घ्या असं आवाहन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंदुरीकर महाराज यांनी आपण कोरोना लस घेणार नाही, असं जाहीर केलं होतं. पण, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अखेरीस इंदुरीकर महाराज यांची समजूत काढण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज

यांनी कोरोनाची लस घ्या, असं आवाहन करायला सुरुवात केली आहे.काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी नाशिकमध्ये कीर्तनाच्या दरम्यान आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे

यांनी आपण इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. अखेरीस आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इंदुरीकर महराजांची जालन्यात भेट झाली.काल जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला राजेश टोपे यांनी हजेरी लावून भेट घेतली.

या भेटीनंतर इंदुरीकर महाराजांनी कोरोना लस घेण्याचे कीर्तनातून आवाहन करणार असल्याचं वचन दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाहीतर जालना येथील कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी प्रत्येकांनी लस घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं आहे.

नाशिकमध्ये झालेल्या एका कीर्तन सोहळ्यात इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात म्हणाले होते की, ‘प्रत्येक माणसाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे.

मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही.काही होतच नाही तर घेऊन काय करणार. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा असे विधान केले होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!