Saturday, November 27, 2021

विखे पाटलांना धक्का:भाजप नगरसेवक, पदाधिकार्यांनी बांधले ‘घड्याळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत कोपरगाव मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

प्रत्येक पक्षाची निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली असून आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन राहात्याचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरेसवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे येणारी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहात्याचे विद्यमान जेष्ठ नगरसेवक निवृत्ती गाडेकर व त्यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बंडूनाना वाबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश केला आहे.त्यामुळे राहाता तालुक्यात निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.

नुतन प्रवेश केलेल्यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी तत्परतेने कामाला लागा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे, ओ.बी.सी सेल चे शहराध्यक्ष शेखर जमधडे, गुलशर शेख, युवक काँग्रेसचे जाईद दारुवाले, हेमंत अनाप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!