Tuesday, November 30, 2021

बड्या अभिनेत्याची पत्नी हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत, मोठ्या उद्योगपतींकडून कोट्यवधी उकळले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हनी ट्रॅप लावून बडे उद्योगपती आणि व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिला फॅशन डिझायनरचा समावेश आहे.

ती नव्वदच्या दशकातील एका बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे. तर दोन पुरुष मॉडेल आणि एक महिला मॉडेल परागंदा झाल्या आहेत.बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी सपना उर्फ लुबना वजीर हिच्याशिवाय दोन पुरुष मॉडेल आणि एक महिला मॉडेल फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे.

अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर लुबना वजीर उर्फ सपनाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिच्याकडे 29 लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली. तर 7 मोबाईल फोन, 2 कार आणि 8 लाखांहून अधिक किमतीचे दागिने सापडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुबना वजीर मुंबईतील जुहू, वांद्रे, लोखंडवाला ते गोव्यापर्यंत किटी पार्ट्या आणि अनेक कार्यक्रम करत असे. या माध्यमातून लोकांशी मैत्री करुन सावजाचा शोध घेतला जात असे.

2016 साली कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याची गोव्यातील एका व्यक्तीशी ओळख झाली, त्यानंतर दोघेही वारंवार बोलू लागले. 2019 मध्ये हा व्यापारी मुंबईतील अंधेरी परिसरात व्यावसायिक कामासाठी आला होता. आरोपीने व्यापाऱ्याची

फायानान्सरसोबत मीटिंग असल्याचं सांगून आपल्या दोन मैत्रिणींना एका पंचतारांकित हॉटेलच्या आलिशान खोलीत भेटायला पाठवले. आपण बिझी असून येणं शक्य नसल्याचा खोटा निरोप फायनान्सरच्या नावे दिला.दोन्ही महिलांनी व्यापाऱ्यासोबत थोडा वेळ गप्पा मारुन खोलीतच जेवणाची ऑर्डर दिली.

यानंतर एक महिला बाहेर कोणीतरी भेटायला आल्याचे सांगून खोलीतून निघून गेली तर दुसरी महिला वॉश रूम मध्ये गेली. थोड्या वेळाने बाहेर गेलेल्या महिलेने येऊन दारावरची बेल वाजवली. व्यापाऱ्याने दरवाजा उघडला. त्याच वेळी वॉशरुममध्ये गेलेली महिला बाहेर आली,

मात्र तिच्या अंगावर कपडे नव्हते, तर तिने एक ब्लँकेट गुंडाळले होते. व्यापाऱ्याने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून ती रडू लागली.दुसऱ्या महिलेने तात्काळ आरोपी आणि तिच्या महिला साथीदाराचा (कथित पीडित) त्याच अवस्थेत व्हिडिओ

बनवला आणि त्याच वेळी त्यांचा पुरुष साथीदारही तिथे आला. त्यानंतर त्याने आधी व्यावसायिकाला धमकावले, त्यानंतर व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.2019 पासून आतापर्यंत या लोकांनी व्यावसायिकाकडून 3 कोटी 26 लाख

रुपये उकळले आहेत. अखेर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली असता या हनी ट्रॅपमागे दोन पुरुष आरोपीही असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र पुढील तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!