Friday, December 3, 2021

बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल:एअर इंडिया विकणाऱ्या व रेल्वे विकायला निघालेल्यांनी…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ज्यांनी एअर इंडिया विकली. रेल्वे विकायला निघाले आहेत. त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना एसटीवर बोलण्याचा बिलकूल अधिकार नाही, असा हल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर चढवला आहे.

मीडियाशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी हा हल्लाबोल केला आहे. एसटी कामगारांच्या हिताची आम्ही जपणूक करत आहोत. या संपातून तोडगा काढण्याचा परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत.

त्यामुळे परिवहन मंत्री या प्रश्नात लक्ष घालत असून त्यावर काही ना काही मार्ग निघेलच, असं थोरात यांनी सांगितलं. काही लोक एसटीचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. हे उघड आहे. ते सर्वांनाच दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कंगना काय आणि गोखले काय हे दोघेही सहज बोलत नाहीत. यामागे कोणी तरी आहे. हे लोक आता देशाच्या राज्य घटनेकडेही वळतील. पण देश राज्यघटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे लक्षात ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या या घटनेत सर्व संतांच्या विचाराचे सार आहे.

पण काही लोक आज स्वातंत्र्यावर शंका घेतात. उद्या ते राज्यघटनेवरही बोलतील, असं ते म्हणाले.ठरावीक लोकांसाठी कृषी कायदे तयार करण्यात आले. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या सरकारने जनतेच्या विरोधात सातत्याने निर्णय घेतले.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नागरिकांना वेठीस धरले. कोरोनाच्या काळात मदत करायची सोडून टाळ्या-थाळ्या वाजवायला सांगितलं गेलं. हे टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!