नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील शेतकरी छानदेव घोडेचार यांच्या जेऊर रस्त्यारील शेतात असलेल्या विहिरीत आठ ते नऊ वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या मूर्त अवस्थेत आढळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी तेलकुडगाव येथील शेतकरी छान देवघोडचर यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे आढळून आले. त्यांनी वनविभागाला कळविल्याने वनपाल देविदास पातारे वनरक्षक मुस्ताक शेख वन कर्मचारी संदीप ठोंबरे,ज्ञानदेव गाडे, सयाजी मोरे,प्रवीण पटारे, सखाराम पटारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाणी केली असता विहिरीत पडलेला आठ ते नऊ वर्षाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.
वन कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला बाहेर काढून घटनास्थळीच त्याचे शवइच्छेदन केले व पुढील विल्हेवाट लावण्यासाठी लोहगाव नर्सरीकडे रवाना केले आहे. सदर बिबट्या दोन दिवसापूर्वी विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे.