Tuesday, November 30, 2021

मंत्री गडाखांचा मोठा गौप्यस्फोट : मला मंत्री व्हायचे नव्हते पण…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा प्रभारी मंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते. मंत्री शंकरराव गडाख यांना विजय औटींचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी होते. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, श्रीकांत पठारे,

युवा सेना प्रमुख नितीन शेळके, शहरप्रमुख निलेश खोडदे, अनिकेत औटी, युवराज पठारे उपस्थित होते.मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, महाविकास आघाडी सरकार बनविताना अनेक अडचणी आल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही निर्णय घ्यावे लागले ते

कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत आहेत. याची जाणीव मलाही आहे. मला मंत्री व्हायचे नव्हते मात्र ती संधी मला मिळाली मात्र औटी यांच्या पराभवाने पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली, असे मत शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.

गडाख पुढे म्हणाले, जिल्हाभरातून मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांची मरगळ झटकून टाकली आहे. राजकारणात पदोपदी फसविले जाते अपयश येते. स्वतःची ताकद सिद्ध करावी लागते आणि विकासकामे करावी लागतात. महसूल, पोलिस

प्रशासनाने शिवसैनिकांना त्रास देऊ नका, मी पण गडाख आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा गडाख यांनी दिला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!