Friday, December 3, 2021

नगर ब्रेकिंग:चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दगडांवर पलटली;अपघातात चालक व त्याचा जोडीदार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खोल दरीत कोसळल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात घडली

हा अपघात रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात चालक व त्याचा जोडीदार किरकोळ जखमी झाला आहे.याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनील गलांडे व त्याचा जोडीदार

 हे दोघे जण रविवारी दुपारी कार मधून संगमनेर येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने घारगावच्या दिशेने जात असताना चंदनापुरी घाटातील वळणावर आले असता चालक सुनील यांचा कार वरील ताबा सुटल्याने

कार थेट महामार्गाच्या कडेला असलेले संरक्षण लोखंडी कठडे तोडून खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहे.अपघात झाल्याची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे,

सुनील साळवे, मनिष शिंदे, संजय मंडलिक, नंदकुमार बर्डै, भरत गांजवे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी क्रेनला पाचारण करण्यात आले आणि खोल दरीतून कार बाहेर काढण्यात आली आहे. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!