Tuesday, November 30, 2021

राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात पाऊस सुरु आहे. गेले काही दिवस राज्यातील अनेक प्रदेशात पाऊसाची रिपरिप सुरु आहे. अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह, पश्चिम

महाराष्ट्रातही पाऊसाची संततधार आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवेच्या वरच्या थरातील चक्राकार सिस्टिममधून द्रोणीय स्थितीजन्य परिस्थिती महाराष्ट्रपर्यंत आहे.

परिणामी पुढील 2 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी २१ आणि २२ नोव्हेंबरला अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टी आणि येथील काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गडगडटासह पावसाची

शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेले काही दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे.राज्यात अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी भातकापणीची कामे सुरु आहेत. या कामात पावसामुळे व्यत्यय येत आहे.

अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र तंबाखू शेतीसाठी हा पाऊस फायद्याचा असल्याने या क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!