Tuesday, November 30, 2021

एखाद्यावर प्रेम असणे ही सेक्ससाठी सहमती असू शकत नाही’; उच्च न्यायालय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बलात्काराच्या आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केरळ हायकोर्टाने एक मोठा निर्णय दिला. हायकोर्टाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमधील ‘प्रेम’ हे सेक्ससाठी संमती असू शकत नाही.

प्रेम आणि सेक्समध्ये खूप फरक आहे आणि प्रेम आहे म्हणजे सेक्सलाही पीडितेची संमती आहे असे मानता येत नाही. न्यायालयाने संमती आणि सबमिशनमधील फरक देखील स्पष्ट केला आणि म्हटले की पंपअपरिहार्य सक्तीच्या समोर असहायता ही संमती म्हणून समजले जाऊ शकत नाही.

केरळ हायकोर्टाने गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यावर म्हटले आहे की, प्रेमात असण्याचा अर्थ असा नाही की महिलेने संबंध ठेवण्यास संमती दिली आहे. निकाल सुनावताना न्यायमूर्ती आर नारायण पिशार्डी म्हणाले की, लाचारी आणि असहायता याला कोणाचीही संमती

 म्हणता येणार नाही. केरळ उच्च न्यायालयाने 26 वर्षीय श्याम सिवनच्या अपीलवर सुनावणी केली. ट्रायल कोर्टाने श्यामला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते, त्यानंतर त्याने केरळ उच्च न्यायालयात अपील केले होते.

न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले की, दोषी श्याम आणि पीडितेचे एकमेकांवर प्रेम होते. 2013 मध्ये श्याम पीडित मुलीला कर्नाटकातील म्हैसूर येथे घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेसोबत जबरदस्तीने संबंध ठेवले. श्यामने पीडितेचे सर्व दागिनेही विकले.

यानंतर तो पीडितेला गोव्यात घेऊन गेला आणि तेथे त्याने पुन्हा मुलीवर बलात्कार केला. श्यामने पीडितेला धमकी दिली होती की, जर ती त्याच्यासोबत गेली नाही तर तिच्या घरासमोर आत्महत्या करेल.

न्यायालयाने पुढे म्हटले की, जरी पीडितेने काही प्रसंगी श्यामला विरोध केला नसला तरी संबंध ठेवण्याची तिची संमती असे समजू शकत नाही. त्यावेळी पीडितेकडे पर्याय नव्हता, ते एक प्रकारचे सबमिशन होते. परंतु केरळ उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने POCSO अंतर्गत सुनावलेली शिक्षा रद्द केली,

कारण घटनेच्या वेळीचे पीडितेचे वय निश्चित केले जाऊ शकत नाही. पण न्यायमूर्ती पिशार्डी यांनी आपल्या आदेशात श्याम दोषी असून त्याला आयपीसीच्या कलम 366 आणि 376 (अपहरण आणि बलात्कार) अंतर्गत शिक्षा होईल, असे सांगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!