Saturday, November 27, 2021

राधाकृष्ण विखे म्हणतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांची कोंडी केली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कारभारावर आज भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ भ्रष्ट आणि सर्वच समाजघटकांची फसवणूक करणारा ठरला. जनादेश डावलून सत्तेवर आलेल्या या राज्य सरकारचा समान कार्यक्रम हा फक्त वसुलीचा होता.

हे आता लपून राहिलेले नाही. शेतकऱ्यांची पोर म्हणून मिरवून घेणारेच बांधावर जावून शेतकऱ्यांची वीज तोडत असल्याची घणाघाती टीका आमदार विखे पाटील यांनी केली.राज्यातील एसटी कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी करून

अनिल देशमुखाबद्दल सहानुभूती दाखविणारे नेते कामगारांच्या संपाबाबत शब्द सुध्दा काढत नाही. कामगारांच्या संपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांची कोंडी केली असून शिवसेनेचा मराठी बाणा आता कुठे गेला असा थेट सवाल त्यांनी केला.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून तीन कृषी विधेयक मागे घेतल्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविकास आघाडी सरकारने सुध्दा कृषी कायदे मागे घेण्याची केलेली तयारी म्हणजे राज्यातील

शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच असल्याने याबद्दल माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.तसेच वास्तविक केंद्र सरकारने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कायदे केले होते. सर्वोच्च न्यायलयाने यासाठी समिती गठीत करून शेतकरी संघटनाना

 पर्याय सुचविण्यास सांगितले होते पण वर्षभर आंदोलक संघटना पर्याय देवू शकल्या नाहीत. या विधेयकांना विरोध करणाऱ्यांनीच केंद्रीय कृषी मंत्री असताना मॉडेल अॅक्टच्या माध्यामातून सुधारणा आणल्या होत्या असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!