Friday, December 3, 2021

सावधान:नगर जिल्ह्याला पुन्हा यलो अलर्टचा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आंध्र प्रदेश मागोमाग महाराष्ट्रावर देखील अवकाळी पावसाचे ढग गडद झाले आहेत. राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे, कोल्हापूर, नाशिक,नगरसह राज्यात

काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात आला आहे.मान्सून माघारी परतला असला, तरी देशात काही राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे.

आंध्र प्रदेशमध्ये पावसाने प्रचंड थैमान घातले आहे. आता महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या (21 आणि 22 नोव्हेंबर) मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पूर्व- मध्य आणि श्चिम- मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान

विभागाकडून काही जिल्ह्यांकरिता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, मच्छिमारांना देखील २ दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!