Friday, December 3, 2021

देशात सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यक नाही – ICMR

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोरोना लसीकरण मोहिम सध्या वेगाने सुरु असली तरी सहा महिन्यांपूर्वी लस घेतलेल्यांमध्ये या लसीचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता तिसऱ्या अर्थात बुस्टर डोसची गरज असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.

मात्र, आयसीएमआरनं यावर स्पष्टीकरण देताना सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधक समीरन पांडा म्हणाले, “सध्या दोन डोस घेतलेल्यांमध्ये ८० टक्के लसीकरण हे आपलं महत्वाचं प्राधान्य आहे.

सध्यातरी देशांतर्गत वैज्ञानिक अभ्यास बुस्टर डोसची आवश्यकता असल्याचं आधोरेखित करत नाहीत. सध्यातरी सार्वजनिक लसीकरण हा आपला प्राधान्याचा कार्यक्रम आहे.दरम्यान, भारतात बुस्टर देण्याबाबत चर्चा झडत असताना विविध वैज्ञानिकांनी देखील देशात कमीत कमी अशतः लसीकरण व्हायला हवं.

इम्युनॉलॉजिस्ट विनीता बाळ म्हणाल्या, “जेव्हा अनेक लोकांना पहिला डोस मिळणं अद्याप बाकी आहे, तरी भारताने या टप्प्यावर बूस्टर डोस देण्याचा विचार केला पाहिजे. असुरक्षित लोक तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा रुग्णांना अतिरिक्त लसीचा डोस अर्थात बुस्टर डोससाठी विचार केला जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सप्टेंबर महिन्यात आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले होते की, “सध्याच्या घडीला बुस्टर डोस हा आपला मध्यवर्ती विचार नाही. लोकांना दोन डोस देणं हे आपलं महत्वाचं प्राधान्य आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!