Saturday, November 27, 2021

मी सुद्धा राजकीय आखाड्यातील अस्सल पैलवान आ.लंकेंचा खा.विखेंना इशारा ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आमच्या जंगी स्वागताने काहींना इतकी अडचण येते त्यांना असे वाटतंय निलेश लंके याने पारनेर तालुका सोडून कुठेच जाऊ नये.जिल्ह्याच्या व्यासपीठावरून लंकेवर टीका करण्याचा धंदा झालाय.तुझं माझं कुठे जुळेल का ?तुझ्याकडे सगळं आहे.

माझ्याकडे हि जनता आहे.मात्र मी सुद्धा राजकारणातील आखाड्याचा अस्सल पैलवान आहे.तुम्हाला धोबीपछाड दिल्या शिवाय राहणार नाही. अशी टीका आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर नाव न घेता केली.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद,अहमनगर जिल्हा तालीम संघ व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सह. साखर कारखाना आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील २०० मल्लानी सहभाग घेतला.यावेळी नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गोरखनाथ बलकवडे,काकासाहेब पवार,अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे ,शांताराम बागुल, ज्ञानेश्वर खुरंगे,

पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, नानासाहेब डोंगरे, शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडु पाटील बोरुडे,दिपाजी बागुल, गाहिनाथ शिरसाट, रफिक शेख, बंडू भांडकर,पै.विलास चव्हाण, डॉ दीपक देशमुख, किरण खेडकर, देवा पवार, योगेश रासने, बबलू शिरसाट,पांडुरंग शिरसाट,

नासिर शेख, संग्राम शेळके, संजय चव्हाण, हिरामण वाघ,युवराज पटारे, दगंबर गाडे,वैभव दहिफळे, चंद्रकांत भापकर आदी उपस्थित होते.पुढे बोलतांना लंके म्हणाले की,या नेत्याने पाथर्डी च्या कार्यक्रमात माझ्या कपड्यांवर सुद्धा टीका करायची सोडली नाही.

मागील विधानसभेला समोर पैलवान सुद्धा दिसत नाही असे म्हणणाऱ्यांना शरद पवार यांनी अस्मान दाखवले. राज्य कुस्ती संघटनेचे शरद पवार हे अध्यक्ष असून पवार इज पॉवर असल्याने ते मल्लांचे प्रश्न निश्चित मार्गी लावतील. बबनराव ढाकणे यांना

राजकीय पार्शवभूमी नसताना त्यांनी आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटवला असून त्यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याचे मोठे काम प्रताप ढाकणे हे करत आहेत. आम्ही दोघेही पवार साहेबांचे चेले असून पुढच्या वेळी ढाकणे हे कुस्ती जिंकणारच आहे. राजकीय

आखाड्यातील मी सुद्धा पैलवान असल्याने अनेक डाव मलाही येतात. हे डाव आले नसले तर मला सतरंज्या उचलाव्या लागल्या असत्या असे शेवटी लंके म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!