Tuesday, November 30, 2021

शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून मिरविणारे आता बांधावर जाऊन शेतकर्‍यांची वीज तोडत आहेत: विखे पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ भ्रष्ट आणि सर्वच समाजघटकांची फसवणूक करणारा ठरला. जनादेश डावलून सत्तेवर आलेल्या या सरकारचा समान कार्यक्रम हा फक्त वसुलीचा होता हे आता लपून राहिलेले नाही.

शेतकर्‍यांची पोरं म्हणून मिरवून घेणारेच बांधावर जाऊन शेतकर्‍यांची वीज तोडत असल्याची घणाघाती टीका भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांतील निष्क्रीय कारभाराचा पंचनामा आ. विखे पाटील

यांनी पत्रकार परिषदेत केला. मी पॅकेज देणारा नाहीतर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे सांगणार्‍यानीच शेतकर्‍यांना 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. परंतु मदत अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नाही. कवडीमोल मदत आता खात्यात वर्ग केली.

परंतु लगेच या वसुली सरकारने वीज बिलाच्या शेतकर्‍यांना नोटिसा पाठविल्या. शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून मिरविणारे आता बांधावर जाऊन शेतकर्‍यांची वीज तोडत आहेत. शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणेचे काय झाले असा सवाल उपस्थित करून

राज्यातील शेतकर्‍यांना तुम्ही खरच मदत केली असेल तर त्याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली.या सरकारच्या कार्यकाळात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. सत्तेवर आल्यानंतर समान वसुलीचा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप करून कोणताही समाज घटक सरकारच्या

कामावर समाधानी नाही. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आरोग्य भरतीत घोटाळा झाला.एसटी कामगार आझाद मैदानात बसले. शेतकरी वीज वितरण कंपनीच्या दारात दिसत असल्याची टीका करतानाच कृषीमंत्रीच

पीक विमा कंपन्यांनी चार हजार कोटी रुपयांचा नफा मिळविल्याची कबुली देत असतील तर हे राज्याचे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त केले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!