Wednesday, December 8, 2021

सारोळा कासार सरपंच अतिक्रमण प्रकरण वेगळ्या वळणावर तिसरा गट घोषित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सारोळा कासार ग्रामपंचायत चे सरपंच यांनी केलेल्या अतिक्रमण विरोधातील लढ्याला आता वेगळे वळण मिळणार असल्याची शक्यता आहे. या सार्वजनिक लढाई प्रकरणी लोक हिता ची भूमिका घेऊन सुमारे चार ते पाच वर्षे

न्यायालयीन मार्गाने लढलेले दिवंगत झुंजार नेते माननीय भाऊसाहेब कडूस पाटील (कृषि पदवीधर संघटनेचे नेते) यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर हे प्रकरण आता वेगळ्या दिशेने जात आहे.या अतिक्रमण च्या बहुचर्चित लढाईत

भाऊसाहेब कडूस पाटील यांच्या बाजूने एकूण तीन निकाल लागले असून, आश्चर्य म्हणजे अर्जदार भाऊसाहेब कडूस पाटील हयात असे पर्यंत त्यांच्या निधना दिवशी लागलेला निकाल देखील त्यांच्या बाजूने लागला. मात्र त्यांच्या निधना नंतर सत्ताधारी

यांनी औरंगाबाद खंडपीठात विविध स्थगिती निवेदने कोर्टा समोर दाखल करुन स्थगिती मिळवली.कडूस कुटुंबाला दुःख झाल्याचा गैरफायदा सत्ताधारी यांनी घेतला आहे आणि भाऊसाहेब पाटील यांच्या जाण्या नंतर त्यांच्या सोबत असणारे देखील सत्ते

करता सत्ताधारी यांना मिळाले आहेत असा आरोप कृषि पदवीधर संघटनेच्या नेत्या श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी केला आहे. भाऊसाहेब कडूस पाटील यांच्या जाण्या नंतर अर्जदार म्हणून त्यांचे खरे वारसदार हे त्यांचे मोठे चिरंजीव व लोकप्रिय युवक नेते महेश कडूस पाटील असताना गावाच्या हिता साठी आम्ही

या कायदेशीर लढ्याला दुसर्या गटाला पाठींबा दिला. परंतु दुसरा गट हा सत्ताधारी यांना या लढाईत सामील झाला असून या पुढे आम्ही तिसरा गट विकास हा मुद्दा घेऊन निर्माण करु असे श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी सांगितले आहे.लोकशाही चे सर्व तत्व पाळणारा संघर्ष करुन गोरगरिबांना न्याय मिळवून

देण्यासाठी म्हणून आमच्या परिवारा ची ओळख असून आम्ही या लढाईचा शेवट करु आणि या पुढे गाव तालुका जिल्हा प्रदेश पातळीवर आम्ही सक्रीय राहून सारोळा कासार चे नाव राज्यात नकाशावर एक नंबर वर येण्यासाठी काम करु. भाऊसाहेब कडूस पाटील यांना क्षणात काही लोक स्वार्थापोटी

विसरले आहेत त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ ठरु देणार नाही सक्रिय राजकारणात तिसरी आघाडी निर्माण होईल अप्रत्यक्ष रित्या लोक सोबत असून, सत्ताधारी आणि विरोधक दोघांना ग्रामस्थ अक्षरशः कंटाळलेले आहेत. लोकशाही मधे बदल घडत असतो अशी प्रतिक्रिया महेश कडूस पाटील यांनी देखील दिली आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!