Wednesday, December 8, 2021

धक्कादायक माहिती समोर : महाराष्ट्रात ११ ते २० वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ११ – २० वयोगटातील मुलांच कोरोनाचे लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकार सतत आणि आग्रहाची मागणी करत असल्याचं म्हटलं आहे. कारण, गेल्या काही दिवसांमध्ये

११ ते २० वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जालना येथे पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी अशी माहिती दिली आहे. राज्यातील कोविड टास्क फोर्सचे देखील मुलांच्या लसीकरण करण्यात

यावे असे मत आहे. या मुलांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी हे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, ३० नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे देखील टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ११ ते १८ या वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. जर या वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण झाली तर त्याचा प्रसार हा वृद्ध वयोगटातील व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या वयोगटातील

मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरला असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर टोपे म्हणाले की , जगभरामध्ये आता ११ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. आपल्याकडे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु नाही.

मात्र, आम्ही सतत मागणी करत आहोत. असंही टोपे म्हणाले.या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळेल याचे नियोजन करण्यात आलं आहे. असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील लसीकरणावर बोलताना राजेश टोपे

म्हणाले की, राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे. मात्र, १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस लवकर पूर्ण करण्यात येईल.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!