Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना:प्रेमसंबंध ठेऊन तरुणीवर अत्याचार, तरुणाने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याने तिची गर्भधारणा झाली. त्यामुळे तिचा गर्भपात व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय गोळ्या दिल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. नगर शहरात ही घटना घडली.

याप्रकरणी सईद ताहेर बेग (वय 33 रा. काटवन खंडोबा) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.

वडीलासह नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या 21 वर्षीय तरूणीला सईद बेग याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेऊन तिच्या इच्छे विरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्या तरूणीने सईदकडे लग्न करण्याबद्दल विचारणा केली असता

त्याने तिला उडवाउडवीचे उत्तर दिले. सईद याचे या पुर्वी दोन लग्न झाले होते. असे असताना त्याने अविवाहित असल्याचे सांगितले अन गोड बोलून तिच्याशी तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केला. त्यातुन ती तरूणी गर्भवती झाली.

तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व शारीरिक छळ केला. तिचा गर्भपात व्हावा म्हणून गर्भ पाताच्या गोळ्या दिल्या. तरूणीला त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!