Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यात कारखान्यांबाहेर उसाचे वजन करण्याचा आग्रह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी यंदाच्या गाळप हंगामातील अडचणीवर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील

सर्व शेतकरी संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी यांची बैठक प्रादेशिक सहसंचालक (साखर) भालेराव यांनी बोलावली होती. या बैठकीला विशेष लेखा परीक्षक विलास सोनटक्के, राजेंद्र निकम आणि राजेंद्र देशमुख यांच्यासह कृषी अधिकारी क्रांती

देेशमुख आणि परिवहन अधिकारी उर्मिला पवार उपस्थित होते.शेतकर्‍यांच्या उसाचे कारखान्यांबाहेर खासगी वजन काट्यावर वजन करून कारखान्याला देण्याची मुभा मिळावी, उसाच्या रिकव्हरीचा रेट वसंतदादा इन्स्टिट्यूटऐवजी एनआयएस (राष्ट्रीय इन्स्टिट्यूट शुगर)

यांच्यामार्फत तपासण्यात यावा. यंदाच्या गळीत हंगामातील अडचणी सोडविण्यासाठी पुन्हा समन्वयाची बैठक बोलवावी, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांच्याकडे केली.

दरम्यान, कोपरगावच्या शंकरराव काळे साखर कारखान्याने शेतकर्‍यांना 2 हजार 500 रुपयांप्रमाणे एफआरपी देणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रतिनिधी सोमनाथ बोरनाळे यांनी दिली. तसेच शेतकर्‍यांनी बाहेरून उसाचे वजन करून आणल्यास तो ऊस स्वीकारणार असल्याचे जाहीर केले.

सुरूवातीपासून शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकरी संघटनेचे अनिलराव औताडे यांनी मागील बैठकीच्या इतिवृत्ताची मागणी केली. एफआरपी न देणार्‍या कारखान्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा केली.

तर दरवेळी रिकव्हरी चोरीची आपण चर्चा करतो. पण त्यावर पुढे काहीही होत नाही. त्यामुळे थळातच उसाची रिकव्हरी तपासली जावी अशी मागणी बाळासाहेब पटारे यांनी केली. तसेच त्यांनी साखर कारखाने वेगवेगळा वाहतूक खर्च दाखवतात याबाबतही मुद्दा उपस्थित केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!