Friday, December 3, 2021

आ. नीलेश लंके, लोकसभेचा विचार सोडून द्या;आपले अंथरूण, पांघरूण सांभाळण्याचा सल्ला 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आमदार नीलेश लंके तुम्ही आर. आर. पाटलासारखे महाराष्ट्रात काम करा. त्यांच्यासारखे व्हा, परंतु आपले अंथरूण, पांघरूण सांभाळा, असा वडिलकीचा सल्ला देत ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे यांनी आ. लंके यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याचे सांगितले.

आ. लंके यांना लोकसभेसाठी प्रोजेक्ट करण्याचे एकीकडे राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच दुसरीकडे लंके यांना पारनेरमध्ये साथ देणारे ज्येष्ठ नेते झावरे यांनी वेगळ्या शब्दात कान फुंकल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
टाकळी ढोकेश्वर

येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयाच्या 20 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचा प्रारंभ आ. लंके व माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला.ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे म्हणाले, पारनेर विधानसभा मतदारसंघात

आ. लंके यांचे चांगले काम आहे. त्यामुळे आ. लंके यांनी वरच्या (लोकसभा) निवडणुकीचा विचार करू नये. तालुक्यातील जनतेला व प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर तालुक्यातच काम करा. पारनेर तालुक्यातून मोठे राजकीय भवितव्य आहे. आर. आर. पाटलांच्या

पावलावर पाऊल ठेवून काम केले पाहिजे. आ. लंके यांचे कोरोना काळातील आदर्श काम महाराष्र्ासह जगाने पाहिले आहे्.त्यामुळे त्यांच्या कामांसाठी कुणाच्या साक्षीची गरज नाही. त्यांचे काम देशात पोहचले आहे. मान खाली घालून ते ऐकून घेतात.

त्यांच्यातील नम्रपणा त्यातून दिसून येतो. तालुक्यातील जनतेने 61 हजार मतांनी निवडून दिले आहे, जनतेचा कौल मान्य करा, असेही माजी आमदार झावरे म्हणाले.आ. लंके म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिवंगत शंकरराव काळे व सॉलिसीटर गुलाबराव शेळके

यांनी तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले. त्यानंतर सव)र्)ात जास्त शिक्षकांना तालुक्यात व जिल्हात रोजगार उपलब्ध करून देणारी जिल्हा मराठा शिक्षण संस्था आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजु आदिवासी विद्यार्थ्यांना

शिक्षण देण्याचे काम जिल्हा मराठा शिक्षण संस्थेने केले. गुणवत्ता व दर्जा टिकवून शिक्षणाची दारे खुली केली असे झावरे म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!