Friday, December 3, 2021

कडूस पाटील यांची विद्यार्थी चळवळीतून निवृत्ती. या पुढे मार्गदर्शकाच्या भुमिकेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र :प्रशिक्षक ते प्रदेशाध्यक्ष” या पुस्तकाचे लिखाण सुरू केले असून मी आता विद्यार्थी चळवळीतून निवृत्ती घेत आहे असे महेश कडूस पाटील यांनी जाहीर केले आहे. गेले दशकातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांची राज्यातील सर्वोच्च संघटना

म्हणून कृषि पदवीधर संघटना या संघटनेने नाव लौकिक मिळवला. या संघटनेचा चेहरा आणि आक्रमक नेते म्हणून नेहमी अग्रस्थानी महेश कडूस पाटील हेच नाव राहिले. विद्यार्थी चळवळीचा चेहरा म्हणून महेश कडूस पाटील राज्यात पुढे आले.

एका कामगार कुटुंबातील तरुण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांना गेल्या एक दशकात प्रचंड लोकप्रियता मिळाली. राहुरी कृषि विद्यापीठा सह राज्यातील चारही कृषि विद्यापिठे आणि त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेवर कडाडून प्रहार करणारी संघटना आणि व्यक्ती म्हणजे

महेश कडूस पाटील असे समीकरण राज्यातील शेतकरी आणि पदवीधर यांनी बघितले.२०१२ च्या आसपास या चळवळी ची सुरुवात झाली, पुणे, नगर, नाशिक पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर विदर्भात आंदोलने उभी करून कृषि पदवीधर संघटना

महेश कडूस पाटील यांच्या चेहर्यामुळे राज्यभर प्रसिद्धी च्या झोतात आली. २०१५ नंतर महेश कडूस पाटील हे राजकीय अभिलाषा मनात बाळगून वाटचाल करीत राहिले. आधी राष्ट्रवादी मग रासप मग शेतकरी कामगार पक्ष अशी वाटचाल त्यांनी केली. नेहमी ते प्रदेशाध्यक्ष याच पदावर राहील्या चे पहायला मिळाले.

२०१६ मधे घराणेशाही विरोधात नाशिक पदवीधर निवडणूक लढून त्यांनी एक अयशस्वी प्रयत्न केला पण त्यांच्या या कृती मुळे सामान्य कार्यकर्ता जो संघटनेला जोडला गेला आहे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि पुढे संघटना सामाजिक आणि राजकीय दोन्ही वलये घेऊन वाढली.

गेले दोन वर्षे महेश कडूस पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते कोरोना काळात प्रचंड प्रमाणात एकवटून त्यांनी कृषि शिक्षण, राज्यातील द्राक्ष बागायतदार यांचे धोरणात्मक प्रश्न अनेक गोष्टींवर राज्यातील शेतकरी पदवीधर यांच्या हिताची कामे केली. गेल्या सहा महिन्यांत महेश कडूस पाटील यांच्या वडीलांच्या

म्हणजे च भाऊसाहेब कडूस पाटील यांच्या निधनानंतर महेश कडूस पाटील यांनी स्वतः ची वाटचाल मर्यादा ठरवून घेतल्याचे दिसून येत आहे. दक्षिण नगर भागात त्यांनी संघटनेला देखील नेत संघटनेचे देखील भौगोलिक अस्तित्व तिथे तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असे वाटते.

सध्या महेश कडूस पाटील हे भाजप च्या जवळ असूनही राष्ट्रवादी मधील पदाधिकारी यांच्या सोबत ची त्यांची जवळीक लपलेली नाही. विद्यार्थी चळवळीतून निवृत्ती घेऊन कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांचे विद्यार्थी चळवळीचे योग्य वेळी योग्य नेतृत्व पुढे तेच ठरवतील असे वाटते. सध्या महेश कडूस पाटील यांनी एकूण बारा वर्षे विद्यार्थी चळवळीत काम केले असून त्यांच्या

या कामा मुळे संघटना व कृषि पदवीधर हा शब्द अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला. त्यांच्या अनेक आक्रमक आंदोलने जनहीताची निवेदने या मुळे हजारो सामान्य तरुणांना शैक्षणिक फायदा झाला. या पुढे ते दक्षिण नगर भौगोलिक क्षेत्रात कार्यरत

राहणार आहेत आणि विद्यार्थी चळवळीला फक्त मार्गदर्शका च्या भुमिकेत राहतील असे त्यांचे सचिव प्रतिक बोंगाडे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!