भेंडा:— हनुमंत राय ही यशाची देवता आहे. म्हणून हनुमान जन्मोत्सव हा घराघरात दिवे लावून चैतन्यमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे असे प्रतिपादन नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीराम कथेचे सहावे पुष्प गुंफताना नंदकिशोर महाराज नेवासेकर बोलत होत.
श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर, ज्ञानेश्वर कारखान्याचे सचिव रवींद्र मोटे ,उस्थळचे सरपंच किशोर सुकाळकर,मुरमेचे सरपंच अजय साबळे,शिवाजीराव तागड ,दत्तात्रय काळे आदी उपस्थित होते.
नंदकिशोर महाराज पुढे म्हणाले की, श्रीराम कथा ही आत्मबोधापर्यंत घेऊन जाणारी कथा आहे. मानवी जीवन जगत असताना सुख-दुःख येत असतात. संकटाला तोंड देण्याची ताकद परमार्थ आणि नामात आहे.
आपल्या जीवनात जो बदल होतो तो श्री गुरूंची कृपा आहे. नाही कुठे जाता आले तरी चालेल पण सदगुरूंच्या दरबारात जावे, सुख-दुःखात सद्गुरू समोर नतमस्तक व्हावे.दांपत्य सुख कसे मिळावं हे राम कथे मधून शिकता येते. गृहस्थ आश्रमामध्ये
पण आपण उन्नती करू शकतो. मनुष्याने बाह्य नाही तर अंतरंग सौंदर्य बघितले पाहिजे. देव आणि संतांचे दर्शन होण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. स्त्रियांच्या जीवनात लक्ष्मी रेषेची मर्यादा आहेत. ती लक्ष्मी रेषा स्त्रियांनी पाळली पाहिजे.
[ रामकथेतून आपण आपल्यालाच शोधायचे-मिराबाई महाराज मिरीकर
श्रीक्षेत्र आळंदीच्या मिराबाई महाराज मिरीकर म्हणाल्या की, आपण कुठे चुकतो, कुठे कमी पडतो हे आपण आपले बघायला पाहिजे. राम कथेमधून आपण आपल्यालाच शोधले पाहिजे. परमार्थ हा स्वभावाने
केला पाहिजे, कोणाच्या दबावाने करू नये. आपल्या मनात मित्रत्व भाव असेल तर समोरची व्यक्ती कितीही दुष्ट असेली तरी ती दुष्टाता विसरते.]