Friday, December 3, 2021

लहान मुलांसोबत ‘ओरल सेक्स’ करणं गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका एका चिमुकल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांसोबत केलेलं ओरल सेक्स म्हणजे गंभीर लैंगिक अत्याचार नाही.

अशाच एका प्रकरणात कोर्टाने दोषी आढळलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली शिक्षा कमी केली आहे.उच्च न्यायालयाने या प्रकारचा गुन्हा POCSO कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दंडनीय मानला आहे. परंतु न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे .

की हे कृत्य उत्तेजित लैंगिक अत्याचार किंवा गंभीर लैंगिक अत्याचार नाही. त्यामुळे अशा प्रकरणात POCSO कायद्याच्या कलम 6 आणि 10 अंतर्गत शिक्षा होऊ शकत नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषीची 10 वर्षांच्या

तुरुंगवासाची शिक्षा 7 वर्षांपर्यंत कमी केली. यासोबतच 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.सोनू कुशवाह नावाच्या व्यक्तीने झाशी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. इथे न्यायमूर्ती अनिल कुमार ओझा यांच्या

एकल खंडपीठाने कुशवाहाच्या शिक्षेविरोधातील अपीलवर हा निर्णय दिला आहे. तत्पूर्वी, सत्र न्यायालयाने त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरवले होते.

अल्पवयीन मुलासोबत ओरल सेक्स हे कलम ५/६ किंवा पॉक्सो कायद्याच्या कलम ९/१० च्या कक्षेत येते का, असा प्रश्न न्यायालयासमोर होता.अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, लहान मुलाच्या तोंडात लिंग घालणे

हे ‘पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार’ या श्रेणीत येते. जे लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम च्या कलम 4 नुसार दंडनीय आहे. , परंतु कायद्याच्या तरतुदींनुसार कलम 6 अंतर्गत नाही.विशेष म्हणजे, सोनू कुशवाहाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश/विशेष न्यायाधीश, POCSO कायदा, झाशी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध

अलाहाबाद उच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते. अपीलकर्त्याविरुद्ध खटला असा होता की, तो तक्रारदाराच्या घरी आला आणि त्याच्या 10 वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन गेला आणि त्याला 20 रुपये देताना त्याच्याशी ओरल सेक्स केला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!