Wednesday, December 8, 2021

महिलेचा खून करून तिचा मृतदेह गटारीत फेकला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका 40 वर्षीय महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना काल दुपारी नाशिक – पुणे महामार्गावरील घुलेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या माझे घर हौसिंग

सोसायटीजवळ श्रमिक बीडी कामगार वसाहतीच्या मोकळ्या जागेत उघडकीस आली आहे.माझे घर हौसिंग सोसायटी परिसरातील श्रमिक विडी कामगारांच्या वसाहती जवळ असलेल्या एका सेफ्टी टँक मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. दुपारी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह सेफ्टी टँक च्या बाहेर काढला. पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

सदर महिलेची ओळख पटू शकली नाही. तिचे वय 40 असल्याचे समजते.अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी या महिलेचा खून करून तिचा मृतदेह या पाण्यात टाकलेला आढळून आले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!