Friday, December 3, 2021

तपासणीसाठी आलेल्या महिलेनं; हनी ट्रॅपमध्ये अडकवत डॉक्टरकडून उकळले 2 लाख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईतील चारकोप परिसरात एका 53 वर्षीय डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून दोन लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं फिर्यादी

डॉक्टरच्या रुग्णालयात शिरून त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले आहेत. यावेळी आरोपींनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण देखील केली आहे. याप्रकरणी 53 वर्षीय डॉक्टरने चारकोप पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 2 महिलांसह 5 जणांना अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी

पाचही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सुधीर शेट्टी (वय-53) असं फिर्यादी डॉक्टरचं नाव असून ते चारकोप परिसरातील सेक्टर 3 मधील रहिवासी आहेत.

पोलिसांनी शनिवारी दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे.8 नोव्हेंबर रोजी आरोपी महिला फिर्यादी डॉक्टरकडे तपासणी करण्यासाठी आली होती. यावेळी डॉक्टर तपासणी करत असताना, आरोपी महिलेनं फिर्यादीचा व्हिडीओ तयार केला.

यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी महिलेनं फिर्यादीकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. पण फिर्यादींनी पैसे देण्यास नकार दिला. हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा प्लॅन फसल्यानंतर, आरोपी महिला 19 नोव्हेंबर

रोजी अमित माने, दीपक माने आणि मनोज नायडू या तिघांसह एका महिलेला घेत फिर्यादीच्या क्लिनिकमध्ये घुसली.क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टरांना मारहाण केली, तसेच त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले. ही घटना घडल्यानंतर डॉक्टर सुधीर शेट्टी

यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!