Sunday, July 3, 2022

गतविजेता भारत फ्रान्सबरोबर लढतीने करणार ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धेची सुरुवात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भुवनेश्वर/गौरव डेंगळे

बुधवार,२४ नोव्हेंबरपासून भुवनेश्वरमध्ये ज्युनियर हॉकी विश्वचषक २०२१ सुरू होत आहे.विवेक सागर प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय ज्युनियर हॉकी संघाला घरच्या मैदानाचा फायदा घेऊन या विश्वचषकात चांगली कामगिरी करायची आहे.
गतविजेता भारत २४ नोव्हेंबरला फ्रान्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. विश्वचषकाचा उद्घाटनाचा सामना बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.

*विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभागी होतील:*
यावेळी विश्वचषकात १६ संघ सहभागी होणार आहेत. विश्वचषक स्पर्धेत चार पूल तयार करण्यात आले असून,प्रत्येक पूलमध्ये चार संघांचा समावेश करण्यात आला आहे.प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.युरोपियन बेल्जियम, मलेशिया,चिली आणि दक्षिण आफ्रिका यांना पूल ए मध्ये स्थान देण्यात आले.भारताला कॅनडा, फ्रान्स आणि पोलंडसह ब गटात स्थान देण्यात आले आहे. नेदरलँड्स,स्पेन,कोरिया आणि यूएसए पूल-सी मध्ये आहेत. त्याचबरोबर जर्मनी,पाकिस्तान, इजिप्त आणि अर्जेंटिना यांचा पूल-डीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
*विश्वचषकात भारताचा दावा मजबूत*
गेल्या वेळेप्रमाणे भारतीय संघ ज्युनियर हॉकी विश्वचषकात दमदार इराद्याने उतरणार आहे. २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने विजय मिळवला होता.या दृष्टीने इतर संघांच्या तुलनेत भारताचे पारडे जड असेल.भारताला घरच्या मैदानावर आणि प्रेक्षकांचाही पाठिंबा मिळेल.कर्णधार विवेक सागर प्रसादच्या नेतृत्वाखाली भारताला ही प्रतिष्ठित ट्रॉफी कायम ठेवायची आहे.संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल कर्णधार विवेकला आत्मविश्वास वाटत आहे. ते म्हणाले,आमचा संघ २०१६ मध्ये चॅम्पियन बनला होता आणि आता आमच्या संघाचे लक्ष्य ते कायम राखण्याचे आहे.”

*प्रशिक्षक ग्रॅहम रीड काय म्हणाले…*
भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी संघाच्या तयारीबद्दल सांगितले,”भुवनेश्वरमधील ज्युनियर खेळाडूंनी वरिष्ठ संघाविरुद्ध काही सराव सामने खेळले,जे खूप मोलाचे होते.येथे आल्यापासून ते स्टेडियममध्ये सतत सराव करत आहेत.कलिंगा हॉकी स्टेडियम खरोखरच प्रतिष्ठित आहे.स्पर्धा सुरू करण्यापूर्वी आम्ही येथे सराव करत आहोत हे चांगले आहे.”

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!