नेवासा
शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने नेवासा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विकासाचा महामेरू म्हणून ओळख असलेल्या शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यात विकास कामांचा धडाका चालूच ठेवला असून विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार शंकरराव गडाख यांनी ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत नेवासा तालुक्यात एक कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळवली असून लवकरात लवकर ही विकास कामे चालू होऊन नेवासा तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे.
राज्यातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार शंकरराव गडाख यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठवला होता या प्रस्तावास राज्य शासनाने तातडीने मंजुरी दिली असून नगर जिल्ह्यात फक्त नेवासा तालुक्यामध्ये हा निधी आणण्यात आमदार शंकरराव गडाख यांना यश आले आहे.
नेवासा तालुक्यातील मौजे अंतरवाली येथे १० लाख रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मिळणे,
जैनपुर येथे राम मंदिरासमोर १० लाख रुपयांची चावडी बांधणे,
खुणेगाव येथे जगदंबा मंदिरासमोर १० लाख रुपयांची चावडी बांधणे,
वाटापूर येथे चैतन्य रेवननाथ महाराज मंदिर परिसरात १० लाख रुपयांचे पेविंग ब्लॉक टाकणे,
उस्थळ दुमाला येथे पांडुरंग मंदिरासमोर १० लाख रुपयांची पेविंग ब्लॉक बसविणे,
कारेगाव येथे सप्तशृंगी माता मंदिरासमोर रुपये १० लाखांचे चावडी बांधणे,पाथरवाला येथे मुंबादेवी मंदिरासमोर १० लाख रुपयांचे चावडी बांधणे,
प्रवरासंगम येथे शंभूराज चौकामध्ये १० लाख रुपयांचे सुशोभीकरण करणे,जळके खुर्द येथे १० लक्ष रुपये खर्च करून शिंदे संदीप वस्ती ते माळजाई मंदिर रस्ता करणे ,
व मुकींदपुर येथे १० लाख रुपयांमध्ये छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर हायवे ते यश मंगल कार्यालय रस्ता करणे इत्यादी सर्व मिळून १ कोटी रुपयांचे काम नेवासा तालुक्यासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी मंजूर करून आणल्याबद्दल नेवासकरांनी आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहे.
तसेच ही कामे राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष प्रयत्नपूर्वक आ.गडाख यांनी ही कामे मंजूर करून आणली आहेत